Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » सीईटी सेलतर्फे ३ वर्षीय एलएलबी कॅप राउंड १ चे वेळापत्रक जाहीर !! | CET LLB Admission 2026
Last Updated:

सीईटी सेलतर्फे ३ वर्षीय एलएलबी कॅप राउंड १ चे वेळापत्रक जाहीर !! | CET LLB Admission 2026

CET LLB Admission 2026

CET LLB Admission 2026 : The 3-year LLB centralized admission process ( CAP ) in Maharashtra has officially commenced, allowing eligible candidates to fill out their college option forms from August 5 to August 7 . According to the State CET Cell , the first seat allotment list will be declared on August 11 , after which students must visit their allotted colleges between August 12 and August 17 for physical document verification and admission confirmation . This year, a total of 48,420 students have registered for the course, bringing much-needed relief to candidates after anxious delays that prompted student groups to demand an expedited schedule.

CET LLB Admission 2026

महारष्ट्र राज्यातील ३ वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) अखेर सुरुवात झाली असून, पात्र विद्यार्थ्यांना ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम (ऑप्शन फॉर्म) भरता येणार आहे. राज्य सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिल्या फेरीची जागावाटप यादी ११ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १७ ऑगस्ट या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चित करावा लागेल. यंदा या अभ्यासक्रमासाठी एकूण ४८,४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, प्रवेश प्रक्रियेतील विलंबाबाबत विद्यार्थी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर ही प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.