Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Important » महानगरपालिकेत सफाई कामगार होण्यासाठी इंजिनिअर, वकिल आणि MBA पदवीधरांची रांग! – Candidates Applying For Garbage Picker
Last Updated:

महानगरपालिकेत सफाई कामगार होण्यासाठी इंजिनिअर, वकिल आणि MBA पदवीधरांची रांग! – Candidates Applying For Garbage Picker

Candidates Applying For Garbage Picker – खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमधील अस्वस्थता आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे आकर्षण यांमुळे उच्चशिक्षित तरुणही चतुर्थश्रेणी पदांकडे वळत असल्याचे चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ‘स्वच्छतादूत’ म्हणून निवड झालेल्या ४७६ उमेदवारांमध्ये एमबीए, बीई (इंजिनिअरिंग), एलएलबी आणि पदव्युत्तर पदवीधारकांचा मोठा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना रविवारी, २६ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. खासगी नोकऱ्यांमधील अस्थिरता आणि कायमस्वरूपी शासकीय नोकरीचे आकर्षण, यामुळे उच्चशिक्षित युवकांचाही कल आता महापालिकेतील चतुर्थश्रेणी पदांकडे वाढताना दिसत आहे. नागपूर महापालिकेत स्वच्छतादूत म्हणून रुजू होणाऱ्या ४७६ उमेदवारांमध्ये एमबीए, अभियंते, विधी पदवीधर, पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांचा मोठा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Candidates Applying For Garbage Picker

या सर्व स्वच्छतादूतांना रविवार, २६ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. महापालिका मुख्यालयातील हिरवळीवर होणाऱ्या कार्यक्रमात एकूण ५७९ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण होईल. यात ४७६ स्वच्छतादूतांसह सरळसेवा भरती प्रक्रियेतील १०३ उमेदवारांचा समावेश आहे. सरळसेवा नियुक्त्यांमध्ये करसंकलक, लिपिक, ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे. नियुक्त होणाऱ्या स्वच्छतादूतांपैकी १२९ उमेदवारांची निवड लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार, तर ३४७ उमेदवारांची निवड आदिवासी सफाई कर्मचारी प्रवर्गातून करण्यात आली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निवड झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक उमेदवार पदवीधर आहेत. अनेकांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, काहींकडे एमबीए, बीई आणि एलएलबीसारख्या व्यावसायिक पदव्याही आहेत. मात्र, कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या संधीमुळे त्यांनी स्वच्छतादूत पद स्वीकारले आहे. यावेळी महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. ४७६ स्वच्छतादूतांना मुद्रित नियुक्तीपत्रांसोबतच पीडीएफ स्वरूपातील नियुक्तीपत्र Whatsapp आणि SMS द्वारेही पाठविले जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्राची डिजिटल प्रत तत्काळ मोबाइलवर उपलब्ध होईल आणि ती भविष्यासाठी जतन करता येईल.

Advertisement

महापौर नीता ठाकरे यांनी या नियुक्त्यांना सफाई कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येत असून, अनेक वर्षांपासून नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी निवासी घरे उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, उपायुक्त निर्भय जैन आदी उपस्थित होते.