६१२ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती; विद्याविहारमध्ये दोन दिवसांचा मेळावा !! | BMC Hospital Job Vacancies
BMC Hospital Job Vacancies
BMC Hospital Job Vacancies : ITI उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी – महानगरपालिकेच्या विविध विभाग आणि रुग्णालयांमध्ये ६१२ प्रशिक्षणार्थी (ट्रेड अप्रेंटिस) पदांसाठी भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांसाठी २० आणि २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विद्याविहार येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह या भरती मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
महापालिकेत प्रशिक्षणार्थी म्हणून एक वर्षाच्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून, विविध १८ व्यवसायांमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार शिक्षण केंद्र आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २० ऑगस्ट रोजी या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. वीजतंत्री, नळकाम, जोडारी, गवंडी, रंगारी, वेल्डर, वाहन दुरुस्ती, यंत्रकाम यांसह विविध व्यवसायांसाठी शिकाऊ उमेदवारांची निवड शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत करण्यात येणार आहे. संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
तारतंत्री, सुतारकाम, संगणक छपाईसह व्यवसायांसाठी उद्या मेळावा
२१ ऑगस्ट रोजी तारतंत्री, थंडकरण व वातानुकूलन दुरुस्ती, बांधकाम आराखडा तयार करणे, सुतारकाम, संगणक छपाई, वाहन सांगाडा दुरुस्ती, डिझेल वाहन दुरुस्ती, संगणक कामकाज आणि पंप दुरुस्ती यांसह विविध व्यवसायांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी भरती मेळाव्याच्या ठिकाणी आवश्यक दोन कागदपत्रांसह अर्ज साद करावा. सामाजिक समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
भरतीची सविस्तर जाहिरात महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गोवंडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एस.टी. वर्कशॉपजवळ, किरोळ रोड, विद्याविहार (प.) येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक समांतर आरक्षणाची टक्केवारी
महिलांसाठी : ३० टक्के, माजी सैनिकांसाठी : १५ टक्के,
प्रकल्पग्रस्तांसाठी : ५ टक्के, खेळाडूंसाठी: ५ टक्के,
भूकंपग्रस्तांसाठी : २ टक्के, दिव्यांगांसाठी: ४ टक्के,
अनाथ मुलांसाठी : १ टक्के.