बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ पदासाठी उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना – BMC bharti Result 2026
BMC Executive Assistant Bharti Result 2026
BMC bharti Result 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ संवर्गातील 1,846 रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल 25 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या सामाईक गुणवत्ता यादीसह विविध टप्प्यांवर तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांमधील काही उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र ते निर्धारित वेळेत उपस्थित राहिले नाहीत. अशा उमेदवारांना आता 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज, प्रवेशपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक व आरक्षणासंबंधी प्रमाणपत्रे तसेच लागू असल्यास दिव्यांगत्व व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेतील पुढील सर्व सूचना महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ व ई-मेल तपासणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि. 06.12.2024, दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि. 25.02.2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
कार्यकारी सहायक सरळसेवा भरती सन-2024 अंतर्गत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामाईक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष उमेदवारांची तात्पुरती निवड यादी क्र.2 सूचना पत्र क्र. एमपीआर/4461 दि. 14.10.2025 अन्वये, तात्पुरती निवड यादी क्र.3 सूचना पत्र क्र. एमपीआर/8684 दि. 20.04.2026 अन्वये व तात्पुरती निवड यादी क्र.4 सूचना पत्र क्र. एमपीआर/9543 दि.08.06.2026 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये खालील उमेदवारांचा अंतर्भाव आहे. त्यानुषंगाने खालील नमूद यादीमधील उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील प्रक्रीयेकरिता उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना सूचनापत्र क्र. एमपीआर/4847 दि. 20.07.2026, दि. 04.08.2026 अन्वये देण्यात आलेल्या होत्या. तथापि, सदर उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. अशा उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील प्रक्रीयेकरिता उपस्थित
राहण्याबाबतच्या खालिल प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 1) दिनांक 17.08.2026 रोजी सकाळी 11.00 वाजता स्थळ- प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालय, सहावा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय, महापालिका मार्ग, मुंबई-400001 येथे उपस्थित रहावे.
2) सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, परिक्षेचे प्रवेश प्रत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक, समांतर आरक्षण विषयक व अन्य सर्व कागदपत्रे, नजीकच्या कालावधीतील तीन फोटो व जन्मतारखेच्या पुराव्यासह तसेच, दिव्यांग आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णय दि. 14.09.2018 नुसार चे नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय दि.05.10.2021 सोबतचे Appendix-i, Appendix-ii, udid card, लेखनिकाचे शैक्षणिक कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्रसह, तसेच सा.शै.मा.व. आरक्षणांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्जामध्ये नमुद शासन शुध्दीपत्रक क्र. बीसीसी 2024/प्र.क्र.75/आरक्षण-3 दि.15.04.2024 नुसार निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची वैधता कालावधी संपुष्टात आलेला असल्यास शासन शुध्दीपत्रक क्र. बीसीसी 2024/प्र.क्र.75/आरक्षण-5 दि.28.06.2024 मधील नमुन्यातील प्रमाणपत्रासह नियोजित स्थळी, दिनांक व वेळेस उपस्थित राहावे.
3) तसेच, निवड प्रक्रीयेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिली किवा भरतीप्रक्रियेचे उल्लघंन केल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याला/तिला निवड प्रक्रीयेदरम्यान अपात्र ठरविण्यात येईल. तसेच, सदर बाब भरती प्रक्रीयेनंतर निदर्शनास आल्यास पूर्वलक्षी प्रभावाने उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
भरती प्रक्रीयेअंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ तसेच इमेल उमेदवारांनी वेळोवेळी पहावे.
| 1 | MPR-4847 Dt.04.08.2026 | CHIEF PERSONNEL OFFICER | Executive Assistant” – Direct Recruitment-2024-Notification to candidates for Medical Examination and NOC. | View Details | 17.08.2026 | 17.10.2026 |
| 2 | MPR-6033 Dt.11.08.2026 | CHIEF PERSONNEL OFFICER | Executive Assistant” – Direct Recruitment-2024-Notification to candidates for appointment. | View Details | 17.08.2026 | 17.10.2026 |
| 3 | MPR-4847 Dt.12.08.2026 | CHIEF PERSONNEL OFFICER | Direct Recruitment-2024-Notification to candidates for Medical Examination and NOC. | View Details | 17.08.2026 | 17.10.2026 |
BMC Bharti Result 2026
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘करनिर्धारण व संकलन’ खात्याच्या आस्थापनेवरील ‘निरीक्षक’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी क्र. कवसं/१९१७/एमसी/२०२४-२५ दि. १६.०९.२०२४ रोजी जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १०.१२.२०२४ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर दि. १०.०३.२०२५ रोजी गुणवत्ता यादी तसेच दि. १६.०४.२०२५ रोजी प्रथम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, प्रथम निवड यादीतील काही उमेदवारांची पदे त्यांच्या समोर नमूद केलेल्या कारणांमुळे रिक्त राहिल्याने, त्यानुसार दि. १७.१०.२०२५ रोजी द्वितीय निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Inspector Recruitment 2024 – 1st Ineligibility List of Candidates
BMC Bharti Result 2026
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानपालिका आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीतील मानव संसाधन विभाग यांच्या मार्फत मानव संसाधन रामन्वयक (कनिष्ठ) या संवर्गातील एकूण ३८ रिक्त पदांसाठी दि.२२.०२.२०२४ रोजी क्र. एमसीजीएम/एचआर/२२६८ दि.२०.०२.२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीची प्रकिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. या भरती प्रकियेत ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांनी कृपया याची नोंद घ्यावी.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
💥 BMC Bharti Cancel Notice
BMC Bharti Result 2025
जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, दि.11.12.2024 आणि दि.12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि.25.02.2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामाईक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष उमेदवारांची तात्पुरती निवड यादी क्र.1 सूचना पत्र क्र. एमपीआर/903 दि.08.04.2025 अन्वये व सूचना पत्र क्र. एमपीआर/4461 दि. 14.10.2025 अन्वये तात्पुरती निवड यादी क्र. 2 प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुनुषखालील नमूद यादीमधील उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील प्रक्रीयेकरिता उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत.
1) खालिल तक्त्यामध्ये नमूद दिनांकारोजी सकाळी 11.00 वाजता स्थळ- प्रशासकीय अधिकारी समिती सभागृह क्र.1, दुसरा मजला, जुनी इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400001 येथे उपस्थित रहावे.
2) सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज, परिक्षेचे प्रवेश प्रत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक, समांतर आरक्षण विषयक व अन्य सर्व कागदपत्रे, नजीकच्या कालावधीतील तीन फोटो व जन्मतारखेच्या पुराव्यासह तसेच, दिव्यांग आरक्षणांतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निर्णय दि. 14.09.2018 नुसार चे नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय दि.05.10.2021 सोबतचे Appendix-i, Appendix-ii,udid card, लेखनिकाचे शैक्षणिक कागदपत्रे आणि स्वयंघोषणापत्रसह नियोजित स्थळी, दिनांक व वेळेस उपस्थित राहावे.
3) सदर कार्यवाही दरम्यान उमेदवाराचा बायोमेट्रिक डाटा घेण्यात येणार असल्याने या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या:
(क) जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि उपस्थित राहाव्याच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
(ख) जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Fingerprints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हाताची बोट सुकली आहेत याची खात्री करून घ्या. (ग) दोन्ही हातांची बोट सुकली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा.
4) तसेच, निवड प्रक्रीयेच्या कोणत्याही टप्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिली किंवा भरतीप्रक्रियेचे उल्लघंन केल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याला/तिला निवड प्रक्रीयेदरम्यान अपात्र ठरविण्यात येईल. तसेच, सदर बाब भरती प्रक्रीयेनंतर निदर्शनास आल्यास पूर्वलक्षी प्रभावाने उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी भरती प्रक्रीयेअंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ तसेच इमेल उमेदवारांनी वेळोवेळी पहावे.