उच्च न्यायालयत फक्त ७ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, पगार जबरदस्त! नविन जाहिरात प्रकाशित!! – BHC Job Vacancies 2026
BHC Job Vacancies 2026 – Friends, here is a piece of good news under BHC Job Vacancies 2026! A very important update has out for candidates looking for a government job with minimum educational qualifications. A new recruitment process has been initiated for various official duties under the establishment of the Bombay High Court, Aurangabad Bench, and the official PDF advertisement for the same has also been published. Under this recruitment drive, 18 vacancies for the post of ‘Cook’ (Swayampaki) will be filled. The application for the Aurangabad High Court Recruitment 2026 needs to be submitted offline. The deadline to submit the application is September 10, 2026.
मित्रांनो, एक आनंदाची बातमी! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर विविध शासकीय कामांसाठी नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याबाबतची अधिकृत PDF जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत ‘स्वयंपाकी’ या पदाच्या १८ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये १७ उमेदवारांची मुख्य निवड यादी आणि ४ उमेदवारांची प्रतीक्षा यादी (Waitlist) तयार केली जाणार आहे. या भरतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठ्या पदवीची गरज नसून किमान इयत्ता चौथी किंवा सातवी उत्तीर्ण असलेले इच्छुक उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात. सातव्या वेतन आयोगानुसार निवड झालेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स एस-३ (रु. १६,६०० ते रु. ५२,४००) आणि नियमानुसार लागू असलेले सर्व शासकीय भत्ते दिले जाणार आहेत. त्यामुळे अल्प शिक्षित परंतु मेहनती उमेदवारांसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात सेवा बजावण्याची ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. सहाजिकच या डवरे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे तेव्हा उशीर करू नका! चला या भरती बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया. आणि हो महत्वाचे, औरंगाबाद उच्च न्यायालय भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२६ आहे.
Advertisement
तर मित्रांनो, या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना काही महत्त्वाच्या पात्रता व अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला म्हणजेच १७ ऑगस्ट २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच अजून एक महत्वाचे म्हणजे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली असून त्यांच्यासाठी वयाची अट ४३ वर्षांपर्यंत राहील. शासकीय किंवा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वयाची अट लागू नसेल. आता शैक्षणिक पात्रतेचा बद्दल माहिती बघूया, जर उमेदवार किमान चौथी किंवा सातवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्यास मराठी व हिंदी भाषा व्यवस्थित लिहिता, वाचता आणि बोलता येत असेल तर आपण या भरती साठी अर्ज करू शकता. याशिवाय उमेदवाराला सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ बनवण्याचा उत्तम अनुभव असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे कुकिंग/स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असेल किंवा ३/५ स्टार हॉटेल अथवा नामांकित संस्थेत काम करण्याचा २ किंवा अधिक वर्षांचा अनुभव असेल अशा उमेदवारांना निवड प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाईल.
भरती प्रक्रियेतील अर्ज पद्धती पूर्णपणे ऑफलाइन ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील (परिशिष्ट ‘अ’) अर्जाची प्रिंट काढून तो पूर्णपणे भरून त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित (Self-attested) प्रती जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा पुरावा, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र (Domicile), आधार कार्ड आणि स्वयंपाकाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. याशिवाय जाहिरात प्रसिद्धीनंतरच्या तारखेचे दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्याची प्रमाणपत्रे, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन आणि ५ रुपयांचे पोस्टाचे तिकीट लावलेले स्वतःचा पत्ता असलेला लिफाफा देखील अर्जासोबत पाठवायचा आहे. पूर्ण भरलेला अर्ज केवळ ‘स्पीड पोस्टाद्वारे’च पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. “प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९” या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. स्पीड पोस्टव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने आलेले किंवा मुदतीनंतर आलेले अर्ज थेट नाकारले जातील.
या भरती प्रक्रियेत अर्जाची सुरुवातीला छाननी केली जाईल आणि उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांनुसार तसेच अनुभवानुसार एक अल्पसूची (Shortlist) तयार केली जाईल. विशेष म्हणजे अर्ज सादर करताना उमेदवारांना कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र छाननीनंतर ज्या उमेदवारांचे नाव अल्पसूचीत येईल, केवळ त्यांनाच प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी रु. २००/- चा डिमांड ड्राफ्ट (DD) किंवा पोस्टल ऑर्डर ‘Registrar High Court Bench at Aurangabad’ यांच्या नावाने जमा करावा लागेल. उमेदवारांची अंतिम निवड एकूण ५० गुणांच्या चाचणीवर आधारित केली जाईल. यामध्ये स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा (३० गुण), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (१० गुण) आणि तोंडी मुलाखत (१० गुण) यांचा समावेश असेल. प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान १५ गुण मिळवणे आवश्यक आहे. निवड झालेली यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीच्या दिनांकापासून २ वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहील. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित आपले अर्ज पाठवून या संधीचा लाभ घ्यावा.
Important Links For AHC Job 2026
|
|
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/kOZeyrdVR |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://bombayhighcourt.nic.in/ |