Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » नवे निकष लागू! स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी आता प्रत्येक संस्थेला विद्यार्थी संख्या मर्यादित !! | BARTI Exam Scholarship
Last Updated:

नवे निकष लागू! स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी आता प्रत्येक संस्थेला विद्यार्थी संख्या मर्यादित !! | BARTI Exam Scholarship

BARTI Exam Scholarship

The state government has announced a revised comprehensive policy for fellowships, competitive exam coaching, and skill development schemes implemented through autonomous institutes like TRTI , BARTI , SARATHI , Mahajyoti , and AMRUT . Under these new guidelines, the beneficiary student strength for research fellowships has been fixed at 100 per institute, and a mandatory maximum annual family income cap of ₹8 lakh has been enforced. Significant changes have also been made to competitive exam training, restricting each institute to a maximum of 400 students for UPSC coaching and a combined limit of 1,000 students for MPSC exams. Additionally, a student can avail themselves of advanced tier training a maximum of two times , while those transitioning from lower-level training will get only one opportunity for higher-level coaching. However, student organizations have strongly opposed this decision, calling the caps unjust and unconstitutional. Meanwhile, key welfare schemes such as Foreign Scholarships , Swadhar , Swayam , Aadhar , and Maintenance Allowance have been excluded from this uniform policy and will continue independently through their respective departments.
BARTI Exam Scholarship
राज्य शासनाने टीआरटीआय (TRTI) , बार्टी (BARTI) , सारथी (SARATHI) , महाज्योती (Mahajyoti) आणि अमृत (AMRUT) या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनांसाठी नवीन सर्वंकष धोरण जाहीर केले आहे. या सुधारित धोरणानुसार, प्रत्येक संस्थेसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या १०० निश्चित करण्यात आली असून, लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल ८ लाख रुपये असणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणातही मोठे बदल करण्यात आले असून, प्रत्येक संस्थेला यूपीएससी (UPSC) प्रशिक्षणासाठी कमाल ४०० आणि एमपीएससी (MPSC) परीक्षांसाठी मिळून १,००० विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, कठीण पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दोन वेळा आणि कमी स्तरावरील प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला पुढील उच्च स्तरासाठी केवळ एकदाच संधी दिली जाणार आहे.
शासनाच्या या नवीन नियमांना विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. परीक्षा पद्धती बदलत असताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी विद्यार्थी संख्येवर निर्बंध आणणे अन्यायकारक आणि संविधानविरोधी असल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, शासनाने परदेश शिष्यवृत्ती , स्वाधार , स्वयंम , आधार आणि निर्वाह भत्ता या योजनांना या सर्वंकष धोरणातून वगळण्याचा निर्णय घेतला असून, या योजना स्वतंत्र स्वरूपात संबंधित विभागांकडून राबविल्या जाणार आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उपलब्ध आर्थिक तरतूद लक्षात घेऊन सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाला निधीच्या उपलब्धतेनुसार अतिरिक्त नियम व लाभार्थी संख्येत बदल करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

BARTI Exam Scholarship

BARTI Exam Scholarship : Written and oral examinations were conducted on behalf of Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute for scholarships for PhD and M.Phil students. He also declared his merits. However, the final list is being delayed. Further details are as follows:-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पीएच.डी. व एम.फील.च्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्याचे गुणही जाहीर केले. मात्र, अंतिम यादी प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बार्टीने दिलेल्या जाहिरातीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील एम. फील.ला प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रवेश पावती तसेच युजीसी च्या नियमानुसार पीएच.डी. चे प्रवेश आररसीच्या तारखेपासून गृहीत घरण्यात आले आहेत.

BARTI Exam Scholarship