Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर! अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळी बोनस जाहिर! – Anganwadi Sevika Diwali Bonus
Last Updated:

खुशखबर! अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळी बोनस जाहिर! – Anganwadi Sevika Diwali Bonus

Anganwadi Sevika Diwali Bonus – महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांनंतर सरकारनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केलीय. सरकारनं अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीज भेट दिली आहे. राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीजची भेट म्हणून दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या पर्यवेक्षिका पदावर पदोन्नतीच्या वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णयानंतर सरकारनं घेतलेल्या या निर्यणामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. Anganwadi Sevika Diwali Bonus 2026-27 : महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट (दिवाळी बोनस) म्हणून मंजूर करण्यात आला आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने 14 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. भाऊबीज भेट (दिवाळी बोनस) शासन निर्णय PDF डाउनलोड लिंक बद्दल पूर्ण माहिती या लेखात दिली आहे.

Anganwadi-Sevika-Diwali-Bonus-2026

या निर्णयाचा राज्यातील एकूण २ लाख १४ हजार ९७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. या योजनेसाठी शासनाकडून एकूण ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका 1,08,627 आणि मदतनीस 1,05,470 असे एकूण 2,14,097 पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट (Diwali Bonus) देण्यात येणार आहे. यासाठी 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेण्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Anganwadi-Sevika-Diwali-Bonus-Bhaubij-bhet-New GR 2026

मित्रांनो, सन 2026 या वर्षातील दिवाळी हा सण 8 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. तर भाऊबीज 11 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच 8 नोव्हेंबर च्या पूर्वी ही रक्कम मिळणार आहे. शासन निर्णयामध्ये भाऊबीज भेटीची रक्कम तात्काळ अदा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई येथील आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. सेविका आणि मदतनीस या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारखी महत्त्वाची कामे करतात. राज्य सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊबीजचं गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.