अंगणवाडी सेविकांना ८,६६० नियमित पदे भरण्यात येणार!- Anganwadi Sevika Bharti 2026
Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2026
तब्बल २३ वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागात ८,६६० नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणा असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सिन निर्णयानुसार, विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८,६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २,८४३ पटे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १,१०,६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २,२१,३२८ मानधनाधारित पदे देखील मंजू करण्यात आली आहेत. मंत्री तटकरे यांनी सांगितले की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्याला किमान १२वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, आगस्ट २०२२ पासून मदतनीस झालेल्या १०वी पास उमेदवारांना डायरेक्ट मुख्य सेविका पदावर नियुक्ती केली जाईल.
अर्ज पद्धती
या नोकरीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
वयाची अट
उमेदवाराचा वय १८ ते ३५ वयोगटामध्ये असावा लागेल.
निवासी प्रमाणपत्र
उमेदवाराला संबंधित नगर परिषद, नगर पंचायत, नगर पालिका किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा लागेल, आणि त्याचा रहिवासी पुरावा सादर करावा लागेल.
पदोन्नती आणि शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने १२वी, पदव्युत्तर, डी.एड, बी.एड, आणि एमएमसीआयटी यासारख्या कोर्सेस केलेले असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात त्या – त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून निवडले जात होते. आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल.
ग्रामीण भागातील महिला उमेदवारांसाठी अंगणवाडी मध्ये नोकरी म्हणजे एक चांगला पर्याय असतो. या साठी अनेक हजारोच्या संख्येने महिला उमेदवार प्रतीक्षेत असतात. यातच अशा १२ वी पास महिलांसाठी नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. या अंतर्गत ४ हजार पेक्षा पदांची मोठी भरती सुरु झाली आहे. या अंतर्गत मासिक वेतन 11,500/- रुपये इतके राहणार आहे. मध्य प्रदेशने 4767 अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2026 आहे. पात्रता निकष आणि अर्ज कसा करायचा याबद्दल जाणून घ्या. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 1,573 अंगणवाडी सेविका आणि 3,194 अंगणवाडी मदतनीसांची भरती केली जाईल, एकूण 4,767 पदे रिक्त असतील. यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंतच्या रिक्त पदांचा तसेच जानेवारी 2026 ते जून 2026 पर्यंतच्या संभाव्य रिक्त पदांचा समावेश आहे. अर्ज दुरुस्त्यांची अंतिम तारीख 12 जानेवारी 2026 आहे. अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.
अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक 12 वी उत्तीर्ण) आहे. 1 जानेवारी 2025 रोजी वयाची अट 18 ते 35 वर्षे आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक प्रमाणपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज शुल्क ₹100 अधिक 18 टक्के जीएसटी आहे. अर्जदार एमपी ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा अधिकृत किओस्कद्वारे chayan.mponline.gov.in या लिंक वरून आपले ऑनलाइन अर्ज करू शकतात.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना यंदा दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत. या उद्देशासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी प्राप्त झाला असून, मंगळवारपासून हा निधी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. दरवर्षी दिवाळीनंतरच भाऊबीज मिळत असल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना असला तरी, यंदा शासनाने आगाऊ निधी वर्ग करून विशेष आनंदाची मेजवानी दिली आहे. राज्यातील अनेक योजना निधीअभावी रखडल्या असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने वेगळी तरतूद करून तत्परता दाखविली आहे.
जिल्ह्यात एकूण २ हजार ७०३ सेविका आणि २ हजार २५० मदतनीस अशा मिळून ४ हजार ९५३ कर्मचाऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार आहेत. एकूण ९९ लाख ६ हजार रुपयांची रक्कम महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेत गतीने सुरू आहे.
राज्यभरात एकूण १ लाख १० हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीज देण्यासाठी तब्बल ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने “आम्हाला भाऊबीज नको, बोनस द्या” अशी मागणी केली होती. इतर सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळत असताना, आम्हालाही किमान एका महिन्याचे वेतन बोनस स्वरूपात देण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र शासनाने भाऊबीज वेळेत देऊन कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक उमटविण्याचा प्रयत्न केला आहे.
अंगणवाडी शिक्षक भरतीतील अनियमिततेविरुद्ध ३० डिसेंबर रोजी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची प्रशासनाने अखेर गंभीर दखल घेतली आणि त्याला यश आले. एटापल्ली तालुक्यातील जरावंडी येथे भरती रद्द केल्याने १४ दिवसांच्या संघर्षानंतर संपावर असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला. सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली आणि भरती प्रक्रियेची चौकशी केली. चौकशीत असंख्य त्रुटी, अपारदर्शकता आणि उल्लंघने आढळून आली, ज्यामुळे प्रशासनाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ठाम निर्णय घेतला. हा निर्णय न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांसाठी एक मोठा बदल होता. गटशिक्षण अधिकारी ऋषिकेश बुराडकर, शिक्षण विस्तार अधिकारी राऊत, जरावंडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मारटकर आणि ग्रामसचिव मनोज गेडाम या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित होते. उपोषणात सहभागी रेश्मा मनोहर सिडाम, सविता नीलकंठ मोहुर्ले आणि प्रतिमा शंकर जराटे यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि सत्याचा अखेर विजय झाल्याचे जाहीर केले.
Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2026
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे. त्यासाठी विभागाने ४० कोटी ६१ लाख ३० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. या निर्णयाचा लाभराज्यातील एक लाख १० हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांना होणार आहे. योजनेच्या आयुक्तांनी भाऊबीज भेट तत्काळ अदा करण्याबाबत कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी एकूण ₹ ४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका असल्याचे मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.
महिलांसाठी एक आनंदाची बातमी, सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या महिलांसाठी एकदम महत्वाची बातमी आहे. महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी परिवेक्षका, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून, या सर्व पदांसाठी १०० दिवसांच्या आत नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अंगणवाडी परिवेक्षका, मुख्य सेविका आणि मदतनीस यांसारख्या पदांवर नोकरी मिळवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची ही एक मोठी संधी आहे. हे पदे महिलांसाठी विशेषतः फायदेशीर असून, त्यांच्याद्वारे बालविकास आणि समाजातील महिलांचे कल्याण साधता येईल. यामुळे इच्छुक महिलांना आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्याची एक नवीन संधी मिळणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यान्वये महिला- बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल, त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे
सर्व जिल्ह्यांच्या भरती लिंक
-
लातूर अंतर्गत १२वी पास उमेदवारांना संधी! अंगणवाडी मदतनिस पदांच्या रिक्त जागा
-
12वी उत्तीर्णांना संधी – अहमदनगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती;अशी होणार भरती – जाणून घ्या!!
-
12 वी उत्तीर्णांना संधी!! अमरावती जिल्ह्यात ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांच्या 50 जागांसाठी नवीन भरती सुरु
- नाशिक अंगणवाडी अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिलांना नोकरीची संधी; 15 पदांची भरती; त्वरित अर्ज करा !!
-
12 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज सुरु!!
- 12वी उत्तीर्णांना संधी – नागपूर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती;अशी होणार भरती – जाणून घ्या!!
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती