१० वी-१२ वी पास तरुणांना विमानतळावर नोकरी! २४४२ पदांची भरती; फ्रेशर्सनाही ३५ हजार सॅलरी | Airport Jobs 2026
नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी आणि १२ वी उत्तीर्ण तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार सुद्धा पात्र असणार आहे. या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून अर्जाची लिंक सुद्धा आम्ही खाली दिली आहे. मित्रांनो, बहुप्रतिक्षित आणि नुकत्याच उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विभिन्न पदांसाठी तब्बल २,४४२ जागांची भव्य भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरती साठी पगार सुद्धा आकर्षक आहे. विमानतळावरील विविध सेवांचे संचालन आणि व्यवस्थापन सुरळीत चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली असून, ही भरती प्रक्रिया ‘नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिसेस’ (NIAS) द्वारे राबवली जात आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही अनुभवाची अट नसून ‘फ्रेशर्स’ तरुणही यासाठी अर्ज करू शकतात.
विविध पदे, शैक्षणिक पात्रता आणि आकर्षक पगार राहणार आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २४४२ पदे भरली जाणार असून, वेगवेगळ्या पदांनुसार पात्रता आणि वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. चला तर पदानुसार या भरती बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ
सर्वात जास्त जागा एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी असून एकूण १२५७ पदे भरली जातील. या पदासाठी उमेदवाराचे १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली असून, निवडलेल्या उमेदवारांना २५,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान मासिक पगार दिला जाईल.
पदाचे नाव – कार्गो एक्झिक्युटिव्ह
दुसरे प्रमुख पद कार्गो एक्झिक्युटिव्हचे असून यासाठी ६३९ जागा उपलब्ध आहेत. या नोकरीसाठीही १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे असून, मासिक वेतन २५,००० ते ३५,००० रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
पदाचे नाव – एअरपोर्ट लोडर
याशिवाय, एअरपोर्ट लोडरच्या ५४६ पदांसाठी फक्त १० वी उत्तीर्ण पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी वयोमर्यादा २० ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली असून, निवडलेल्या कर्मचाऱ्यांना १५,००० ते २५,००० रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.
कशी असेल निवड प्रक्रिया (Selection Process)?
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड प्रामुख्याने लेखी परीक्षेच्या (Written Test) गुणांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत उमेदवारांना जनरल अवेअरनेस (सामान्य ज्ञान), अॅप्टिट्युड आणि रिझनिंग (बुद्धिमत्ता/गणित), इंग्रजी भाषा आणि अॅव्हिएशन (विमान वाहतूक क्षेत्र) याशी संबंधित सामान्य प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण ९० मिनिटांची (दीड तास) असेल आणि प्रश्नपत्रिका १०० गुणांची असेल. सर्वसामान्य उमेदवारांना परीक्षा देणे सोपे जावे, यासाठी परीक्षेचा स्तर १० वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ठेवण्यात आला आहे.
अर्ज कसा करावा? (How to Apply through niasjewar website) – या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली असून, इच्छुक उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकतात:
सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला https://niasjewar.co.in/jobs.php (niasjewar.com) भेट द्या. वेबसाइटवर जाऊन आपल्या वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरच्या साहाय्याने ‘रजिस्ट्रेशन’ (नोंदणी) करा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर लॉग-इन करून मुख्य ‘अर्ज फॉर्म’ उघडा आणि विचारलेली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
त्यानंतर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा. विहित परीक्षा शुल्क ऑनलाईन जमा केल्यानंतर अंतिम फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआऊट भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा.
आज ११ जून २०२६ रोजी देखील या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया वेगाने सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ
अर्ज कसा करावा?
(How to Apply through niasjewar website) – या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली असून, इच्छुक उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून अर्ज करू शकतात: