मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये २३७ पदांची भरती, ITI, पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! – Ahmedabad Mumbai Bullet Train Job NHSRCL Vacancies
Ahmedabad Mumbai Bullet Train Job NHSRCL Vacancies आपल्याला माहीतच असेल भारतातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणजेट बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. हा भारत सरकारचा एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प साकारणाऱ्या ‘नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (NHSRCL) कंपनीने मोठी पदभरतीची घोषणा केली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) द्वारे जाहीर करण्यात आलेली ही भरती बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विविध तांत्रिक विभागांना बळकटी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या पदभरतीअंतर्गत तंत्रज्ञ (Technician) प्रवर्गातील विविध रिक्त जागा भरल्या जाणार असून, निवडक उमेदवारांना थेट भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीत आणि देखभालीत योगदान देण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सिव्हिल आणि ट्रॅक फिटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हाय-स्पीड रेल्वेच्या ट्रॅकची जोडणी आणि त्याच्या मजबुतीकरणाची मुख्य जबाबदारी असेल. मेकॅनिक आणि रोलिंग स्टॉक टेक्निशियन्स हे बुलेट ट्रेनच्या डब्यांची तांत्रिक तपासणी, इंजिनचे व्यवस्थापन आणि रेल्वेच्या गतीशी संबंधित यांत्रिक प्रणालींची देखभाल करतील. याशिवाय, ड्राफ्ट्समन आणि सर्व्हेयर हे प्रकल्पाच्या अचूक आराखड्यावर व जमिनीच्या सर्वेक्षणावर काम करतील. इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकॉम टेक्निशियन्स यांच्यावर रेल्वेची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आणि दळणवळण व्यवस्था चोख ठेवण्याची अत्यंत संवेदनशील जबाबदारी असेल, जी बुलेट ट्रेनच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच वेल्डर, प्लंबर आणि पेंटर यांसारख्या कुशल कारागिरांना पायाभूत सुविधांच्या प्रत्यक्ष उभारणीचे व फिनिशिंगचे काम करावे लागेल. थोडक्यात सांगायचे तर, या सर्व पदांवरील कर्मचाऱ्यांचे मुख्य काम बुलेट ट्रेनच्या सुरक्षित, वेगवान आणि अखंडित वाहतुकीसाठी तांत्रिक साहाय्य पुरवणे हेच असणार आहे.
तसेच या भरती साठी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या या ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असून, पात्र उमेदवारांनी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच nhsrcl.in ला भेट देऊन आपला अर्ज अचूकपणे सादर करणे आवश्यक आहे. या साठी अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे. तसेच लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी प्रवर्गांनुसार अर्ज शुल्काची रचना करण्यात आली आहे. सामान्य (General) प्रवर्ग, इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) मधील उमेदवारांना अर्जासाठी ४०० रुपये शुल्क भरणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, सामाजिक समतेचा आणि महिला सक्षमीकरणाचा विचार करून अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि सर्व महिला प्रवर्गातील उमेदवारांना या अर्ज शुल्कातून पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू आणि पात्र उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. चला आता रिक्त पदांचा तपशील बघूया.
| Vacancy No. | Name of the Post | No. of Posts |
|---|---|---|
| 35/2026 | Technician (Civil/Track-Fitter) | 18 |
| 36/2026 | Technician (Civil/Track-Mechanic) | 16 |
| 37/2026 | Technician (Civil/Track-Draughtsman) | 8 |
| 38/2026 | Technician (Civil/Track-Surveyor) | 7 |
| 39/2026 | Technician (Civil/Track-Electrician) | 8 |
| 40/2026 | Technician (Civil/Track-Welder) | 6 |
| 41/2026 | Technician (Civil-Plumber) | 2 |
| 42/2026 | Technician (Civil-Painter) | 2 |
| 43/2026 | Technician (Electrical) | 77 |
| 44/2026 | Technician (Signalling & Telecom) | 63 |
| 45/2026 | Technician (Rolling Stock-Fitter) | 10 |
| 46/2026 | Technician (Rolling Stock-Machinist) | 2 |
| 47/2026 | Technician (Rolling Stock-Welder) | 2 |
| 48/2026 | Technician (Rolling Stock-Electrician) | 13 |
| 49/2026 | Technician (Rolling Stock-RAC) | 3 |
| Total | 237 |
मित्रांनो, मुंबई आणि अहमदाबाद या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर भारताच्या दळणवळण क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल ठरत आहे. या प्रकल्पाचे काम सध्या अत्यंत युद्धपातळीवर सुरू असून, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर NHSRCL ने एकूण २३७ रिक्त तंत्रज्ञ पदांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेचे नियम पाळणे बंधनकारक असून, अर्जदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे, असा निकष ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे तरुण आणि उत्साही तांत्रिक हातांना या प्रकल्पात मोठी संधी मिळणार आहे. हा प्रकल्प केवळ रेल्वेचा वेग वाढवणारा नसून देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती देणारा ठरणार आहे. अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पात तंत्रज्ञ म्हणून काम करणे ही देशातील कुशल तरुणांसाठी केवळ एक नोकरी नसून, देशाच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहिण्याची आणि आपल्या उज्ज्वल भविष्याला नवी दिशा देण्याची एक अद्वितीय आणि सन्मानजनक संधी आहे.
Important Links For nhsrcl.in Bharti 2026 |
|
| 📑PDF जाहिरात | https://lnk.ua/QEmqnanA6 |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/JjMDukhqZ |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://nhsrcl.in/ |