Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात, तरी १४ हजार जागा रिक्त !! – 11th Admission 2026 – 2027
Last Updated:

अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात, तरी १४ हजार जागा रिक्त !! – 11th Admission 2026 – 2027

11th Admission 2026-27

ऑगस्ट महिना संपत आला, तरी अकरावीच्या प्रवेशाचे गाडे काही रुळावर आलेले नाही. प्रवेशासाठी विशेष फेऱ्यांचा धडाका सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवेश प्रक्रियेचा पेच कायम आहे. प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी जिल्ह्यात तब्बल १४ हजार अकरावीच्या जागा अद्यापही विद्यार्थीविना रिक्त राहिल्या आहेत.

साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेशाच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, महाविद्यालयांमध्ये वर्गही सुरू झाले; तरी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या तब्बल १४ हजार जागा अद्याप रिक्त आहेत. विशेष फेरीच्या माध्यमातून या जागा भरण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी ही फेरी पूर्ण झाल्यानंतरही सर्व जागा भरण्याची शक्यता धूसरच आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीलाच संकेतस्थळ बंद पडणे, सर्व्हर कोलमडणे यांसारख्या तांत्रिक अडचणींनी प्रक्रियेचा वेग मंदावला. या अडथळ्यांवर मात करून प्रवेश प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी अखेर शंभर टक्के प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

Advertisement

विशेष फेरीतून प्रवेशाची दारे खुली असली, तरी हजारो रिक्त जागांचा प्रश्न शिक्षण विभागासाठी अद्याप कायम आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्याने प्रवेश प्रक्रियेतील असमतोल पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

विद्यार्थ्यांचा शाखानिहाय कल, गुणांचे निकष, पसंतीची महाविद्यालये तसेच शहरांकडे वाढलेला ओढा यामुळे काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ, तर काही ठिकाणी जागा रिक्त राहण्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात रिक्त जागांचा सखोल आढावा घेऊन प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य निर्णय घेणे शिक्षण विभागासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

11th Admission 2026-27


राज्य मंडळामार्फत शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर, शिक्षण संचालनालयामार्फत तातडीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकराची प्रवेशासाठी १८ मे ला विद्याथ्यांची गुणवता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, २१ मे पासून पहिल्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश फेरीची (कॅप) प्रक्रिया सुरू होणार आहे.

Advertisement

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तीन नियमित फेऱ्या, चौथी खुली फेरी व पाचवी मुलीकरीता विशेष फेरी राचविली जाणार आहे. https://mahafyjca dmissions.in या संकेतस्थळावर चिद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.

शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ११ ते १३ मे दरम्यान विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता येणार आहे. १४ मे ला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, १६ मे पर्यंत त्यावर हरकती नोंदविता येणार आहेत. १८ मे ला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, १८ ते २० मे दरम्यान शून्य फेरीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. २१ मेला विद्याथ्यांना पहिल्या प्रवेश फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील. २६ मे ला पहिल्या फेरीरखठीचे जागा वाटप जाहीर केले जाणार आहे. २६ ते २८ मे दरम्यान विद्याथ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्य आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशानंतरच्या रिक्त जागा २९ मे ला जाहीर केल्या जाणार असून, ३० मेला दुसऱ्या फेरीसाठीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

शिक्षण संचालनालयामार्फत १० एप्रिलपासून अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ८ मे पर्यंत सात लाख ७४ हजार १९८ विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. ३६ हजारांवर अधिक जागा राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत एक लाख ८१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, अकरावीसाठी दोन लाख १७ हजार ९४५ जागा उपलब्ध आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३६ हजार ७९० जागा अधिक आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.


11th Admission 2026-27

राज्यातील इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा (२०२६-२७) पाच फेऱ्यांमध्ये पूर्ण करावी लागणार असून, नियमित तीन फेऱ्या संपल्यानंतर मुलींसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. तसेच, १५ जुलै किंवा त्यापूर्वी शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

गत वर्षी अकरावीची प्रक्रिया केंद्रिभूत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली होती. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठीच्या तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच ६ मे २०२५ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण विभागाव्यतिरिक्त आदिवासी विभाग, सामाजिक न्याय आणि अन्य विभागांच्या राज्य मंडळ संलग्न शाळांच्या प्रमुखांनी मान्यता दिल्यास संबंधित शाळा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.

मात्र, संबंधित विभागांनी ३० एप्रिलपूर्वी परवानगी देणे अनिवार्य असेल. खासगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास टाळाटाळ करणे, विलंब करणे, प्रवेशास मनाई केल्यास कारवाई करण्यास विभागीय शिक्षण उपसंचालकांना प्राधिकृत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • सर्व विद्यार्थ्यांना एकाच ऑनलाइन अर्जाद्वारे राज्यातील महाविद्यालयांची निवड करता येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना किमान एक तर कमाल दहा पसंतीक्रम नोंदवता येतील.
  • दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, त्यानंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन टू ऑल) फेरी आणि मुलींसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे.
  • अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशही ऑनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करता येईल.

11th Admission Process

नागपूर विभागात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या अंतिम फेरीनंतर तब्बल ८६,०१६ जागा रिक्त राहिल्या आहेत. ही फेरी ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आली.केंद्रीय प्रवेश समितीद्वारे राज्यभर अकरावीचे प्रवेश केंद्रीकृत पद्धतीने घेतले जात आहेत. मागील काही महिन्यांपासून विविध फेऱ्या — सीएपी तसेच कोटा फेऱ्या — पार पडल्या असून, सध्या विशेष अंतिम फेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. नागपूर विभागातील १,३११ महाविद्यालयांत एकूण २ लाख २१ हजार २३५ जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांनंतर १ लाख ३५ हजार २१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये मिळून अजूनही ८६ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.

  • भंडारा : ७,०२७ जागा रिक्त
  • चंद्रपूर : १३,१८० जागा रिक्त
  • गडचिरोली : ५,५८६ जागा रिक्त
  • गोंदिया : ८,४८९ जागा रिक्त
  • नागपूर : ४२,१८४ जागा रिक्त
  • वर्धा : ९,५५० जागा रिक्त

11th Admission Process

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अद्यापही महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून विशेष फेरी राबवली जात आहे. या फेरीची गुणवत्ता यादी उद्या (मंगळवार, १९ ऑगस्ट) जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ आणि २० ऑगस्ट रोजी प्रवेशाची संधी मिळणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यभरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत तब्बल १२ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे , मात्र अजूनही ९.५ लाखांच्या आसपास जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

📊 प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती

  • राज्यातील ९,५२५ महाविद्यालयांत एकूण २१,५०,१३० जागा उपलब्ध

    • १८,०७,४४६ जागा कॅप प्रवेशाच्या

    • ३,४२,६८४ जागा कोटाअंतर्गत

  • एकूण १४,५७,३०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली

    • कॅपमार्फत प्रवेश घेतलेले विद्यार्थी : १०,४२,७०९

    • कोटामार्फत प्रवेश घेतलेले विद्यार्थी : १,६०,७३३

    • एकूण प्रवेश निश्चित विद्यार्थी : १२,०३,४४२

सद्यस्थितीत अजूनही ७,६४,७३७ कॅप जागा १,८१,९५१ कोटा जागा अशा मिळून ९,४६,६८८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे विशेष फेरीत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची नवी संधी मिळणार आहे.


11th Admission Process

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची आणि त्यांना वाटप झालेल्या महाविद्यालयांची यादी गुरुवारी (दि. ३१ जुलै) जाहीर करण्यात आली. चौथ्या फेरीत अनेक महाविद्यालयांचा कट ऑफ घसरून ७५ टक्क्यांपर्यंत आला असून, ही विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अखेरची संधी आहे. या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना आपला प्रवेश शनिवार, २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित करावा लागणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदा प्रथमच राज्यभर केंद्रीय अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु, तिसऱ्या फेरीस अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चौथ्या फेरीत प्रवेशासाठी अधिक संधी उपलब्ध झाली आहे.

नाशिक विभागात एकूण १,८३,८०० जागा उपलब्ध असून, आतापर्यंत कॅप (CAP) प्रक्रियेतून ७७,७१३ आणि कोटांतर्गत १५,२१२ अशा एकूण ९२,९२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

तरीही चौथ्या फेरीनंतर अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही संधी न गमावता तात्काळ आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


11th Admission Process 2024 – 2025

यंदातब्बल २४ महाविद्यालयांचा समावेश अकरावी प्रवेशात झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली . यामुळे अकरावी प्रवेशात ३ ते ४ हजार जागा वाढणार आहेत. वाढ झालेल्या महाविद्यालयांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १३ तर मुंबई उपनगरातील महाविद्यालयांची संख्या ६ एवढी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरु होणार आहे. यासाठी नवीन महाविद्यालयांच्या जागा नोंदणीची मुदत उद्या संपणार आहे. अकरावी प्रवेशासाठी स्वयंअर्थसहाय्याच्या नावाने विनाअनुदानित महाविद्यालयांना दरवर्षी नव्याने काही महाविद्यालयांना संस्थाचालकांची मागणी आल्यानंतर सरकारच्या वतीने मान्यता दिली जाते. तर दुसऱ्या बाजूला काही महाविद्यालयात बहुतांश तुकड्यांमध्ये विद्यार्थीच फिरकत नसल्याने रिक्त जागांची संख्या वाढताना दिसते. असे असताना काही ठिकाणी अकरावी प्रवेशासाठी एमएमआर क्षेत्रातील महाविद्यालयांची संख्या वाढताना दिसत आहे

महाविद्यालयात पायाभूत सुविधा नाहीत, शैक्षणिक वातावरण नाही, अशा ठिकाणी दरवर्षी मान्यता घेवून जागा वाढतात. अशा महाविद्यालयांचा फायदा विद्यार्थ्यांना काडीमात्र होत नाही. अशा तक्रारीही पालकांच्या असतात. गेल्यावर्षी सुमारे २४० तुकड्यांत एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नसल्याची माहितीही माहिती अधिकारातून उघड झाली होती. तरीही अशा महाविद्यालयांना मान्यता देवून शिक्षण विभाग कोणाचा फायदा करते? असाही सवाल उपस्थित होत आहे. यंदा वाढ झालेल्या महाविद्यालयात मुंबई विभागात ६ महाविद्यालये ठाणे विभागात १३, रायगडमध्ये १ आणि पालघर जिल्ह्यात ४ अशी २४ महाविद्यालयांची भर पडली आहे.


11th Admission 2024 – 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
अमरावतीसह राज्यातील सहा विभागांसाठी अकरावी प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दोन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोनमध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे असतात. दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा, या संदर्भातील माहिती कळावी यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २४ मेपासून विद्यार्थी नोंदणी आणि ऑनलाइन अर्जाचा भाग १ भरता येणार असून, शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. यंदा विशेष फेरी १ नंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याआधी २२ ते २३ मे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.

असे असेल अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

  • विद्यार्थी-पालक प्रशिक्षण जनजागृती (२१ मेपासून दोन दिवस)
  • नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव (२२ ते २३ मे)
  • प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग १ भरणे (२४ मेपासून पुढे दहावी (एसएससी बोर्डाचा) निकाल लागल्यानंतर दोन दिवसांपर्यंत)
  • अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करणे (२४ मेपासून पुढे दहावी निकालानंतर दोन दिवसांपर्यंत)
  • कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी (२२ मेपासून दहावी निकालापर्यंत)
  • कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे (अर्ज भाग २) (दहावी निकालानंतर पाच दिवस (प्रत्येक फेरीपूर्वीही संधी)
  • कोटा अंतर्गत प्रवेश (दहावी निकालानंतर पाच दिवस)
  • नियमित प्रवेश फेरी १ (दहावी निकालानंतर १० ते १५ दिवस)
  • नियमित प्रवेश फेरी २ (७ ते ९ दिवस)
  • नियमित प्रवेश फेरी ३ (७ ते ९ दिवस)
  • विशेष फेरी १ (७ ते ८ दिवस)
  • विशेष फेरी २ (एटीकेटीसह (एक आठवडा)

11th Admission 2024 – 2025

11th Admission 2024 – 2025 : Eleventh Admission online access from Next Week – मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुढील आठवड्यात होणार आहे. दहावीच्या निकालापूर्वी हा प्रवेशाचा टप्पा असेल. दहावीच्या निकालानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेसाठी दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला ही माहितीही पुरविण्यात आली असल्याने पुढील आठवड्यात या प्रवेशाच्या नोंदणीचा पहिला टप्पा सुरू होईल. यात विद्यार्थ्यांना लॉगीन आयडीच्या माध्यमातून आपली प्राथमिक माहिती भरण्याची प्रक्रिया करता येईल. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेत मागील काही वर्षांमध्ये तीन ते चार महिना चालणारी प्रवेश प्रक्रिया ही आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी फेऱ्यांवर नियंत्रण आणले जाणार आहे. यामुळे नियोजित वेळेतच प्रवेश प्रकिया संपवली जाणार असून त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.

न्यायालयाचे आदेश

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेच्या निकषावर करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला मागील काही वर्षांत डावलेले जाते. त्यासाठी प्रथम प्राधान्य फेरी राबवून हे आदेश पायदळी तुडवले गेले. प्रवेश फेन्ऱ्यांचे नियोजन करताना अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या जागा प्रत्यार्पित करण्यासाठी सूट दिल्याने मराठी आणि गुणवत्ताधारी विद्याथ्यर्थ्यांवर वेळोवेळी अन्याय झाला असून यावेळी त्यात सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. यासाठी सिस्कॉम संस्थेने वेळोवेळी सूचना, अहवाल आणि अभिप्राय विभागाला दिले आहेत.